
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित असणारा “सत्यशोधक” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सदरील चित्रपट हा फलटण येथील नामवैभव चित्रमंदिर येथे प्रदर्शित करण्यात येत असून फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागांमधून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सदरील शोचे टायमिंग हे दुपारी 12 वाजताचे करावे; अशी आग्रही मागणी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती व महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने चित्रपटगृहाकडे करण्यात आलेली आहे.
