पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%


स्थैर्य, दि.१६: भारतात शनिवारपासून जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. मात्र लक्ष्याच्या तुलनेत, पहिल्याच दिवशी केवळ 53% लोकांना कोरोना लस देण्यात आली. 3,006 ठिकाणी 3 लाख 15 हजार 37 लोकांना लस दिली जाईल असे सरकारने सांगितले होते. संध्याकाळी सरकारने पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्रांची संख्या वाढून 3351 झाली आहे, परंतु येथे केवळ 1 लाख 65 हजार 714 लोकांना लस देण्यात आली. संध्याकाळी 7.45 वाजेपर्यंत हा डेटा एक लाख 91 हजार 181 पर्यंत पोहोचला.

सर्वाधिक लसीकरण करणारी 15 राज्ये

आंध्र प्रदेश 16,963
बिहार 16,401
उत्तर प्रदेश 15,975
महाराष्ट्र 15,727
कर्नाटक 12,637
प. बंगाल 9,578
राजस्थान 9,279
ओडिसा 8,675
गुजरात 8,557
केरळ 7,206
मध्यप्रदेश 6,739
छत्तीसगड 4,985
हरियाणा 4,656
तेलंगाणा 3,600
तमिळनाडू 2,728

Back to top button
Don`t copy text!