स्वातंत्र्य दिनी चायना मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला केले मुक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
लक्ष्मीनगर, फलटण येथून नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या सदस्यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी चायनीज मांजामध्ये अडकलेल्या गव्हाणी घुबड जातीच्या वन्य पक्षाला मुक्त केले.

घुबड चायनीज मांजा अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समजताच नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य वेळेवर घटनास्थळी पोहचून सुखरूप मुक्त केले. त्यास पुढील उपचारासाठी वनविभागाला सुपूर्द केले.

हे बचावकार्य संस्थेचे सदस्य पंकज पखाले, बोधीसगर निकाळजे, गणेश धुमाळ, शुभम गुप्ते यांनी स्थानिक नागरिक अविनाश शेवाळे, डॉ. अस्मिता भोई, निलेश साळुंखे व इतरांच्या मदतीने पार पडले.

यावेळी संस्थेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, अशाप्रकारे वन्यपक्षी बंदी असलेल्या चायनीज मांजा किंवा धाग्यामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावे. संपर्क क्र :- ७५८८५३२०२३, ७०२०८६९८६७.


Back to top button
Don`t copy text!