दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज श्री. कृष्णा (अण्णा)देविदास पवार यांची भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली. निवडीनंतर माजी खासदार रणजितसिंह यांनी कृष्णा पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी भाजपाचे फलटण – कोरेगाव विधानसभाप्रमुख सचिन कांबळे (पाटील), देविदास अण्णा पवार (पाटील), भाजपा फलटण पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रसाद पवार (पाटील), भाजपा कायदा आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संदीप (भैय्या) कांबळे, भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग फलटण शहर अध्यक्ष तेजस (भैय्या) कदम, दिलीप पवार, अरुण पवार, उमेश पवार, अनिल पवार, सोशल मीडिया अध्यक्ष ओंकार कुमठेकर, आरडी ग्रुपचे अध्यक्ष राहुलदादा पवार, अभिषेक पवार, अविनाश पवार, भाजपा कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.