
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 18 जुन 2024 | फलटण | फलटण तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दुधेबावी, बरड, भाडळी या गावांसह पूर्व भागातील इतर गावांमध्ये व माण तालुक्यातील डोंगर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पाऊस कळताच फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक हे ऑन फील्ड पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली.
