गोखळी परीसरात सर्व कंपन्यांचे नेटवर्क वारंवार गायब

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी आणि परिसरात आयडिया, बीएसएनएल इ. कंपनीचे नेटवर्क वारंवार ‘गुल’ होत असल्याने मोबाईल हॅण्डसेटची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती झाली आहे. मोबाईल टॉवर शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. एकविसाव्या शतकात सर्व क्षेत्रात ऑनलाईनचा वापर होत असताना केवळ नेटवर्कमुळे बोलणं सुरू असताना एकमेकांना आवाज ऐकू न येणे, एकदम महत्त्वाचे बोलणं थांबणे, या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हजारो रुपयांचे हॅण्डसेट खेळण्यातील वस्तू बनल्या आहेत.

गोखळी गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. शिवाय चार सहकारी पतसंस्था, चार सहकारी विकास सोसायटी, माध्यमिक-प्राथमिक शाळा, उद्योग-व्यवसाय असून सर्व संस्थांचे व्यवहार ऑनलाईन असल्याने मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्याने कामकाजात अडथळे येत आहेत. नागरिकांना महत्त्वाच्या कामांकरीता मोबाईल फोनचा करायचा म्हटलं तर नेटवर्क (रेंज) गायब झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकमेकांना संपर्क साधला जात नाही. रोख पैसे भरून मासिक रिचार्ज मारूनसुध्दा केवळ रेंज नसल्यामुळे वेळ, श्रम, पैसा वाया जात आहे.

आयडिया कंपनीच्या कारभाराबद्दल ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावोगाव मोठमोठे उभारण्यात आलेले टॉवर्स शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी त्वरित कट कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!