
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । मुंबई । “निसर्गकवी, गीतकार, पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून जाणारी आहे. मराठी साहित्यविश्व आपल्या कवितांनी समृद्ध आणि निसर्गरम्य करणारे थोर कवी ना. धों. महानोर यांच्या जाण्याने रानावनातील निसर्गकवी हरपला,” अशी शोकसंवेदना राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
“ना.धों. महानोर यांच्या जाण्याने काव्य क्षेत्रातील पोकळी कधीच भरून निघणार नाही. त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.” अशी शोकभावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.



