दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील रिक्त १७ कोतवाल पदांपैकी ८० टक्के पदे म्हणजेच १४ पदांसाठी दि. १७ जुलै २०२३ रोजी जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार २० जुलै २०२३ ते २८ जुलै २०२३ अखेर कोतवाल भरती परीक्षेस बसण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
या कालावधीमध्ये फलटण तालुक्यातील एकूण १५२ अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांपैकी छाननीअंती १४७ उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र झाले असून उर्वरित ५ उमेदवार हे अपात्र करण्यात आले आहेत. अपात्र ठरलेले ५ अर्ज भरलेले उमेदवार अन्य आरक्षित प्रवर्गातील असणे अथवा सजेतील रहिवासी नसणे असे आहेत.
सजानिहाय पात्र व अपात्र अर्जांचा तपशील खालीलप्रमाणे आहे…
- अ. सजाचे नाव लागू आरक्षण प्राप्त पात्र अपात्र
क्र. अर्जांची अर्जांची अर्जांची
संख्या संख्या संख्या
१ गुणवरे अनुसूचित जाती (महिला) ११ ११ ०
२ साठे अनुसूचित जाती २१ २१ ०
३ गोखळी अनुसूचित जमाती १ ० १
४ वाठार निं. इतर मागास वर्ग (महिला) ५ ४ १
५ होळ इतर मागास वर्ग ४ ३ १
६ राजुरी आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक ४ ३ १
(महिला)
७ तडवळे आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक ५ ५ ०
८ खामगाव सर्वसाधारण / खुला ५ ५ ०
(महिला)
९ वडले सर्वसाधारण / खुला ११ ११ ०
(महिला)
१० हिंगणगाव सर्वसाधारण / खुला १६ १५ १
११ गिरवी सर्वसाधारण / खुला २३ २३ ०
१२ तरडगाव सर्वसाधारण / खुला ११ ११ ०
१३ कुसूर सर्वसाधारण / खुला ६ ६ ०
१४ धूळदेव सर्वसाधारण / खुला २९ २९ ०
एकूण १५२ १४७ ५
वरीलप्रमाणे छाननीअंती पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले असून उमेदवारांनी संबंधित गावाचे तलाठी यांच्याशी संपर्क करून प्रवेशपत्र समक्ष ताब्यात घ्यावे. परीक्षेसंदर्भातील सर्व सविस्तर सूचना प्रवेशपत्रांवर नमूद करण्यात आलेल्या असून संबंधित उमेदवारांनी परीक्षेस येण्यापूर्वी त्यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. कोतवाल भरती २०२३ ची लेखी परीक्षा दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत यशवंतराव चव्हाण हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे आयोजित केली असून यासाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी १०.०० वाजेपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
परीक्षेसंदर्भात कोणत्याही उमेदवारास कोणतीही शंका / संदिग्धता असल्यास तहसील कार्यालय, फलटण येथे कार्यालयीन वेळेत निवासी नायब तहसीलदार यांच्याशी परीक्षा दिनांकापूर्वी संपर्क करावा, असे आवाहन कोतवाल निवड समिती २०२३ चे सदस्य सचिव तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.