दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटणची जलतरण कन्या कु. रुचिता कदम हिने 50m.,100m.,200m.Back Stroke,50m Free Style या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच 100m.,200m.,800m.Free Style क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक संपादन केला.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.