ग्रेड सेपरेटर तात्काळ सुरु न केल्यास आंदोलन


 

स्थैर्य, सातारा, दि.३: पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. राजवाडा- पोवई नाका ते मध्यवर्ती बस स्थानक, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील ग्रेड सेपरेटरचे काम पुर्ण झाले आहे. पोवई नाका ते वायसी कॉलेज या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पुर्ण झालेले रस्ते वाहतूकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. उदघाटनाचा कार्यक‘म ज्यावेळी घ्यायचा असेल त्यावेळी घ्या आणि ज्यांच्या हस्ते घ्यायचा असेल त्यांच्या हस्ते घ्या. मात्र त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची कुचंबना करु नका. येत्या आठवडाभरात ग्रेड सेपरेटरमधील पुर्ण झालेल्या मार्गावरुन वाहतूक सुरु करा अन्यथा स्वत: बॅरेकेटस काढून आंदोलन करु आणि वाहतूक सुरु करु, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे. 

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सातार्‍यातील सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे सातारा शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. बांधकाम विभागाकडून ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु आहे. केवळ आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण करुन चालणार नाही तर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी तात्काळ खुला करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला ग्रेड सेपरेटर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. पोवई नाका हे शहराचे मु‘य ठिकाण आहे. सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु नसल्याने या रस्त्यांवर वाहतूकीचा ताण पडत आहे. गेले कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची ङ्गक्त चर्चा सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी कधी खुला होणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. 

सध्या सातारकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. ग्रेड सेपरेटरमधील ज्या मार्गांचे काम पुर्ण झाले आहे ते मार्ग खुले केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. केवळ उदघाटनासाठी ग्रेड सेपरेटर खुला न करणे हे अनाकलनीय कोडे आहे. ग्रेड सेपरेटरचे उदघाटन जेव्हा करायचे असेल तेव्हा सवडीने आणि आवडीने करा पण, त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय करु नका. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निर्णय घेवून येत्या आठ दिवसांत ग्रेड सेपरेटरमधील काम पुर्ण झालेले मार्ग खुले करावेत अन्यथा लोकहितासाठी मला स्वत: ग्रेड सेपरेटरला लावलेले बॅरेकेटस काढून रस्ता सुरु करण्याचे आंदोलन करावे लागेल असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!