शीतल आमटेंच्या आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा


 

स्थैर्य, चंद्रपूर, दि.३: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जे इंजेक्शन टोचून शीतल आमटे यांनी आत्महत्या केली ते विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचं असल्याचं समोर आलं आहे.

डॉ. शीतल यांचे निकटचे कुटुंबीय, नोकर, घरगुती मदतनीस यांचीदेखील चौकशी पुर्ण झाली आहे. इतकंच नाही तर डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठवला आहे. यातील काहींमध्ये सॉफ्टवेअर लॉक असल्याही सांगण्यात येत आहे.

या तपासामध्ये विषारी इंजेक्शन घेत शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. हे विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचं असल्याची माहिती आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!