स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हातारपण सुखकर कर रे बाबा : ’एक मनोकामना ’

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 25, 2021
in विशेष लेख
ADVERTISEMENT

स्थैर्य, आरोग्य विशेष : सध्याच्या युगात मेडिकल शास्त्र प्रगत झाले असल्यामुळे मनुष्याचे आयुर्मान जरूर वाढले आहे पण निरोगी आयुष्य किती वृद्ध लोकांना मिळते आहे ही एक विचार करण्याची गोष्ट आहे.
साधारण 80 वयापर्यंत मनुष्याचे आयुर्मान निश्‍चित धरले गेले आहे. 60 वया पर्यंत सहसा आरोग्याच्या तक्रारी भेडसावत नाहीत. पण त्यानंतर मग वृद्ध काही व्याधींनी ग्रासलेले दिसतात.
अलझायमर्स, मेंदू आकुंचन पावणे, पार्किंसोनिझम, हाडे ठिसूळ पणा, लकवा मारणे, खुब्यातील हाडे मोडणे आणि डिप्रेशन अशा अनेक व्याधींनी बरेच वृद्ध ग्रासलेले दिसतात. दीर्घायुष्य तर मिळते पण निरोगी आयुष्य मिळेल याची काही गॅरंटी नाही.
हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकतीच मला माझ्या मोठ्या काकांची (की ज्यांचे वय सध्या 92 आहे ) त्यांची सेवा करण्याचा योग आला किंबहुना तो भगवंतांनी आणला असे मी म्हणीन. ते मध्यप्रदेश येथील सागर युनिव्हर्सिटी मध्ये योगाचे विभाग प्रमुख होते. त्यांनी ओशो रजनीश यांच्या बरोबरपण काम केले आहे. रोज योग केल्यामुळे त्यांचे आयुष्य उत्तम निरोगी आणि सुदृढ गेले. पण गेले काही दिवस त्यांना अलझायमर्स आणि डिमेंशियाचा त्रास होऊ लागला आहे. अशा वेळी खरच दीर्घायुष्य चांगले की वाईट हा प्रश्‍न पडतो.
तपस ही एक अशी संस्था आहे की जी अशा सर्व वृद्धांसाठी  सौ. प्राजक्ता वडगावकर यांनी पुणे येथे सुरू केली आहे. त्या प्रसिद्ध डॉ. अनिल अवचट यांच्या नातेवाईक आहेत. परवाच त्यांना भेटण्याचा योग आला. तिथे सध्या 45 वृद्ध राहत आहेत की ज्यांना वर सांगितल्याप्रमाणे आजार आहेत आणि त्यांचे वय 51 वया पासून 102 असे आहे. हे सर्व वृद्ध एका कुटुंबा प्रमाणे राहतात आणि त्यांना लहान मुलांसारखे जपले जाते. त्यांची सर्व बाजूनी उत्तम काळजी घेतली जाते.
खरंय जसा जसा माणूस वृद्ध होईल तसा तो मनानी लहान मुलांसारखा वागायला लागतो आणि म्हणूनच की काय नातवांचे आणि आजी-आजोबांचे अगदी व्यवस्थीत जमते .
म्हातारपण म्हंटले तर सुखावह असते पण कधीकधी ते त्रासदायक पण होऊ शकते. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धती मध्ये वयानी मोठी माणसे घरात असणे हा एक मोठा आधार असायचा आणि वेळोवेळी त्यांचे सल्ले घेतले जायचे. त्यांचा आदर केला जायचा आणि त्यांची योग्य काळजी पण घेतली जायची.
पण जशी एकटी कुटुंब पद्धती आली तशी वृद्ध माणसे घरातील एक अडगळ होऊन बसली आणि ती नकोशी होऊ लागली. ’वृद्धाश्रम’ या मुळेच निघाली असावीत आणि ओसंडून वाहाताहेत. फलटण कुरवली येथील वृद्धाश्रमात सध्या 18वृद्ध रहात आहेत .
घरातील वृद्धांची काळजी घेणे हे प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे कर्तव्य आहे असे मी समजतो. आपल्याला जन्म दिल्याचे ऋण फेडण्याचा तो अति-उत्तम मार्ग आहे. त्यांना फक्त तुमच्या  मायेचा ओलावा आणि थोडेसे प्रेम एवढेच अपेक्षित असते. जी मुले आपल्या आई-वडिलांची  काळजी घेत नाहीत त्यांना त्यांच्या म्हातारपणी हेच भोगावे लागते यात काही शंकाच नाही. (जसे पेराल तसे उगवेल).
वृद्ध होणे ही सहज गोष्ट आहे पण ती निस्तरणे ही अवघड गोष्ट आहे. प्रत्येकालाच कधीना कधीतरी वृद्ध व्हायचे आहे, पण हा वृद्धापकाळ सुखाचा, निरोगी आणि आनंदी जावो हीच सर्वांची मनापासून इच्छा असते. प्रत्येकालाच असे वाटते की आपल्याला वृद्धापकाळात चालते बोलते असतानाच पटकन मरण यावे पण तसे सगळ्यांच्याच बाबतीत होतेच असे नाही.
तर मित्रहो जाताजाता,
’म्हातारपण देगा देवा, पण ते सुखाचे असुदे,
पिकले पान कधी गळून पडेल माहित नाही, हे मनी वसुदे,
श्रद्धा आणि सबुरी ठेवली म्हणजे आयुष्य सुकर होईल,
येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन आनंदाने जगणे हाच आपला हट्ट राहील !!’
जय श्रीराम !
डॉ.प्रसाद जोशी,
अस्थीरोगशल्य चिकित्सक,
जोशी हॉस्पिटल प्रा.लि;
फलटण.

ADVERTISEMENT
Previous Post

भारत सरकारच्या महिला लैंगिक शोषणविरोधी समितीवर मंगल देवकर यांची निवडमहिलांसाठी केलेल्या कामाची गृह मंत्रालयाने घेतली दखल

Next Post

शाहीर प्रमोद जगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित 

Next Post
डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथमित्र पुरस्कार स्विकारताना शाहीर प्रमोद जगताप. समवेत मान्यवर.

शाहीर प्रमोद जगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद;
संस्थेने दिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विशेष धन्यवाद

March 8, 2021

एमजी मोटर इंडियाची महिला दिनानिमित्त मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

March 8, 2021
वृक्षारोपण करताना अ‍ॅड. सौ. मधूबाला भोसले,  सौ.प्रगती ताई कापसे , सौ.सुवर्णाताई  खानविलकर , सौ.दिपालीताई निंबाळकर, सौ .
राजस भोईटे

फलटण नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण

March 8, 2021

महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी शेखर सिंह

March 8, 2021

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

March 8, 2021

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

March 8, 2021

फलटण तालुक्यातील २४ तर सातारा जिल्ह्यातील १८२ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

March 8, 2021

पसरणी घाटात दोन कारची धडक, पर्यटनाला आलेले पती-पत्नी व लहान मुलगी जखमी

March 8, 2021

कोरेगावनजिक अपघातात बिजवडीचा मोटारसायकलस्वार ठार

March 8, 2021

लोणंदच्या भारत गिअर्सचे कामगार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण

March 8, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.