📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, गोखळी दि.25 : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील शाहीर प्रमोद जगतात यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ मित्र पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे येथील हॉटेल सुकांता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे, प्रा.पगारिया, प्रा.चंद्रकांतदादा वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहीर प्रमोद जगतात यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले असून या पुरस्काराबद्दल त्यांचे साहित्य, सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
