दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२४ | फलटण |
माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासमवेत विचारविनिमय करण्यासाठी फलटण, माण, खटाव, कोरेगांव (उत्तर) तालुयातील प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू-भगिनी यांची गुरुवार, दि. २१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे सभा आयोजित केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही सभा अत्यंत महत्त्वाची असल्याने या सभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, फलटण, माण, खटाव, कोरेगांव (उत्तर) यांनी केले आहे.