लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांची जातीय दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम


दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज दुपारी फलटण विमानतळ येथे फलटण पोलीस विभागाकडून जातीय दंगा काबु योजनेंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली.

जातीय तणाव निर्माण झाल्यास, जातीय दंगा झाल्यास समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचे पोलीस दलास प्रशिक्षण दिलेले असते. या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आज फलटण पोलिसांकडून जातीय दंगा काबु योजनेंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या रंगीत तालीममध्ये फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण विभागातील शिरवळ, खंडाळा, लोणंद, फलटण ग्रामीण आणि फलटण शहर या पोलीस ठाण्यांकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह रंगीत तालीममध्ये फलटण नगर परिषद, फलटण यांची रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाने सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!