प्राणी क्लेष सोसायटीची सभा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यास प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीने दोषींवर तात्काळ गुन्हा नोंद करुन कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्राणी क्लेष सोसायटीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविण पवार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेख सिंह यांनी यावेळी, नागरिकांच्या तक्रारीवरुन भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याबाबत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण व शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांची देखरेख समिती स्थापन करुन मनुष्य कुत्रा संघर्ष टाण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित होण्यासाठी निर्बीजीकरण शिबीराचे आयोजन करावे. जिल्ह्यामध्ये पाळीव प्राणी दुकान नियम 2018 व श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 ची अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्यानुसार श्वान प्रजनन व पाळीव प्राणी विक्री करणारे दुकाने व आस्थापने यांनी त्वरीत महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे यांच्याकडे नोंदणी करावी अन्यथा त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याच्याही सुचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!