पुरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । पाटण परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाटण शहर व विविध ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होते. संबंधित यंत्रणांनी पुरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने  गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील व संबंधित यंत्रणांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संभाव्य पुरस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले.

यावेळी  अतिवृष्टीमुळे कोयना नदीला पुर आल्याने पाण्याखाली गेलेल्या मुळगाव पुलाची पाहणी  व पाटण एस.टी. स्टँड परिसरातील पुरपरिस्थितीची पाहणी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी  केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!