
दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.