
स्थैर्य, सातारा, दि. १६ : कोव्हिडं 19चे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे.त्या आव्हानाला आपण सामोरे जात आहोत.बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून कैलास स्मशानभूमीत जे कोव्हिडं 19 मुळे मयत होत आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार करतात.बालाजी चॅरिटेबलचे काम कौतुकास्पद आहे.त्यांना आणखी चांगल्या लोकांची मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांच्यावतीने कैलास स्मशानभूमीत दोन अग्निकुंड जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मासअध्यक्ष उदय देशमुख, मास उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, बालाजी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र चोरगे, सातारा कोविद डिफेंडर ग्रुपचे विनीत पाटील व सर्व मास पदाधिकारी उपस्थितीत होते.मासने नेहमीच सातारा जिह्यातील उद्योजकांच्या सहकार्याने लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे, मग ते पूरस्तिथी असो अथवा कोविड-19.सातारा जिह्यातील लहान पासून मोठा उद्योग असलेले उद्योजक कायम समाजाच्या व प्रशासनाच्या मदतीला धावून जात असतात.कोविड-19 विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर सुधारावी, यासाठी सर्व उद्योजकाकडून मास असोशिएशन मार्फत अथवा आपापल्या परीने वस्तू व आर्थिक स्वरूपात प्रशासनास मदत करत आहेत.कोविड-19 विषाणूमुळे वाढत्या मृत्यू आकडय़ांची दखल घेऊन, जिल्हाधिकारी शेखर सिंह
यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ला आवाहन केले होते की, कैलास स्मशानभूमी संगममाहुली, सातारा येथे कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या लोकांसाठी वेगळी शवदाहिनी असावी, जेणेकरून नैसर्गिक अथवा इतर आजाराने मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना कोविड-19 चा संसर्ग होऊ नये.त्यास प्रतिसाद देऊन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा तर्फे बालाजी चरिटेबल कैलास स्मशानभूमी संगममाहुली, सातारा यांना प्रत्येकी 1 टन वजन असलेल्या अल ब्रा कंपनी जेजुरी यांच्या मजबूत अशा 2 शवदाहिनी देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे त्यांची संपूर्ण टीम खूप चांगले काम करत आहेत.संगमाहुली येथील कैलास स्मशानभूमीत कित्येक वर्षांपासून नियोजन बद्द पध्द्तीने काम करत आहेत.ब्रयाच दिवसापासून विचार होता भेट देण्याचा पण येऊ शकलो नव्हतो.येथे स्मशानभूमीत चोरगे यांना व्यवस्थापन कोरोनाच्या अनुषंगाने केले आहे.संगममाहुली गावाचा प्रशासनाला पाठींबा आहे.प्रोटोकॉलप्रमाण कोव्हिडं मयताचे अंत्यसंस्कार करतो आहे.आपल्याकडे कुंडाची कमतरता चोरगे यांनी बोलुन दाखवली.दोन कुंड मासच्या वतीने देण्यात आले आहेत. करोना चे जिह्याच्या समोर जे आव्हान आहे कोव्हिडंच्या मृतावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला पाठींबा मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
राजेंद्र चोरगे यांनी कैलास स्मशानभूमीत शेण्याच्या गोव्रया वापरून अंत्यसंस्कार केले जातात.त्यामुळे वृक्ष तोड थांबते.पर्यावरणाचे रक्षण होते.लोकांना रोजगार मिळतो.रक्षा ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक संस्थेला दिली जाते. येथे सुरक्षितता घेतली जाते, असे चोरगे यांनी सांगितले.