मुधोजी हायस्कूलची विद्यार्थिनी कु. कृपा रणवरे भारती विद्यापीठाच्या इंग्रजी परीक्षेत राज्यात तृतीय; सलग चौथ्या वर्षी प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा


भारती विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ परीक्षेत मुधोजी हायस्कूलची विद्यार्थिनी कृपा रणवरे हिने १०० पैकी ९६ गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 3 मे : भारती विद्यापीठांतर्गत ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी – एन्ट्रन्स्) परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ७ वीत शिकणारी विद्यार्थिनी कु. कृपा प्रशांत रणवरे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने या परीक्षेत १०० पैकी तब्बल ९६ गुण प्राप्त करून राज्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल तिला नुकतेच रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

सलग चौथ्या वर्षी यशाची परंपरा कायम:

इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी – एन्ट्रन्स् / इंग्रजी – प्रायमरी) परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने सलग चौथ्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेची विद्यार्थिनी कु. कृपा प्रशांत रणवरे हिच्या रूपाने राज्यपातळीवर या प्रशालेने आपला ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. तसेच प्रशालेतील इतर अनेक विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

शाळेचा एकूण निकाल व विद्यार्थ्यांचे यश:

या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता ६ वी ‘इंग्रजी प्रायमरी’ (English Primary) परीक्षेला एकूण ९१ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.

तसेच, इयत्ता ७ वी ‘इंग्रजी एन्ट्रन्स्’ (English Entrance) परीक्षेला एकूण ११७ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ६० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर २२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करत उत्कृष्ट यश मिळवले.

मार्गदर्शक शिक्षक:

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी एन्ट्रन्स् परीक्षेसाठी विद्यालयातील इंग्रजी बाह्य परीक्षा विभाग प्रमुख श्री. अमोल सपाटे, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. सोहनी सस्ते, विषय शिक्षक श्री. सचिन धुमाळ, कु. संगीता कदम, सौ. मुक्ता शिंदे, कु. सुषमा घोरपडे आणि सौ. विभा गुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव:

कु. कृपा प्रशांत रणवरे हिने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.

यासोबतच, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री. दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी श्री. सुधीर अहिवळे, प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननवरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने, माध्यमिक विभाग पर्यवेक्षक श्री. राजेंद्र नाळे, श्री. आर. बी. निंबाळकर, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनीही कृपाचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!