
स्थैर्य, सातारा, दि. १६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरूवारी जाहीर झाला. कोल्हापूर विभागात सातारा जिल्हय़ाचा 92.18 टक्के तर कोल्हापूर जिल्हय़ाचा 93.11 टक्के निकाल लागला असून विभागात कोल्हापूर जिल्हय़ाचा प्रथम क्रमांक आला आहे. सांगली जिल्हय़ाचा 91.63 टक्के निकाल लागला. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 92.42 टक्के इतका आहे. तीन्ही जिल्हय़ात 162 केंद्रावर ही परीक्षा झाली. कोल्हापूर विभागाने नेहमीप्रमाणे राज्यात तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. यंदाही बारावीच्या परीक्षेतत मुलींनीच बाजी मारली आहे.
बारावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक म्हणजे 96.57 इतके आहे. कोल्हापूर विभागात 55 हजार 814 पैकी 53 हजार 900 इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 68 हजार 444 पैकी साठ हजार 569 मुल उत्तीर्ण झाली आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 89.01 टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या बारावीच्या निकालात 5.33 टक्के इतकी वाढ झाली आहे.