
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । सातारा । माहेरहून सोने आण असे म्हणत विवाहितेचा जाचहाट केला. याप्रकरणी पती अजित शिंदे, संगीता शिंदे, रुपाली शिंदे, तुषार शिंदे, तेजस्विनी अडसुळ सर्व रा. संभाजीनगर, सातारा यांच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सौ.सोनाली अजित शिंदे वय २८, रा.संभाजीनगर, सातारा यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. २१ फेब्रुवारी २0२२ ते १७ मार्च २0२२ या कालावधीत घडली आहे. संशयितांनी माहेरहून सोने आण, असे म्हणत इतर विविध कारणातून विवाहितेचा छळ केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
