
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । सातारा । शिवी का दिली, असे म्हणत चौघांनी एकाला मारहाण केली. ही घटना दि. २ एप्रिल रोजी लिंब येथील आवळा माथा येथे घडली. याप्रकरणी सौरभ सावंत, आकाश सावंत, मयुर सावंत, प्रज्वल सावंत सर्व रा.चतुरबेट, लिंब, सातारा यांच्या विरुध्द अनिकेत दादासो जाधव वय २१, रा.कोडोली यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी काठी, दगडाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.
