दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | फलटण |
महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ग्रामपंचायतस्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ विडणी ग्रामपंचायतीतर्फे सौ.धनश्री प्रसाद बडवे यांना प्रदान करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी विडणी गावचे सरपंच सागर अभंग, उपसरपंच अब्दागिरे, ग्रामविकास अधिकारी साळुंखे, तुळशीदास बडवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. धनश्री बडवे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.