महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायती लढवणार


 

स्थैर्य, मोरगिरी, दि.१९: पाटण तालुक्‍यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार असल्याची माहिती पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीस सातारा जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार, उपाध्यक्ष अंकुश कापसे, संजय सत्रे, पाटण शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, नेरळे शाखा अध्यक्ष राम माने, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर, मरळी विभाग अध्यक्ष हणमंतराव पवार, चित्रपट सेना तालुकाध्यक्ष नितीन बाबर, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष राहुल संकपाळ, स्वयंरोजगार सेना तालुकाध्यक्ष संभाजी चव्हाण, सतीश यादव आदी उपस्थित होते. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबतीत योग्य ती व्यूहरचना करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार आहे. 

पाटण तालुक्‍यातील मनसैनिक व मुंबई, पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. गावाकडे दुसऱ्या पक्षाचे काम करणाऱ्या प्रत्येक मनसैनिक व पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात सर्वांनी आपापल्या गावी जाऊन निवडणुकीचे काम पाहण्याचे आहे, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍याच्या निवडणूक रिंगणात मनसे उतरली असल्याचे श्री. नारकर यांनी या बैठकीत सांगितले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!