फलटण: शिवसेनेतर्फे पदाधिकारी आढावा बैठक व सत्कार समारंभ – मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने बुधवारी (दि. २७) पदाधिकारी निवड आढावा बैठक, BLA-२ नोंदणी अभियान आणि विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २६ मे : शिवसेना २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने बुधवारी, २७ मे रोजी सकाळी १० वाजता शहरातील अनंत मंगल कार्यालय येथे एका भव्य सत्कार समारंभाचे व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांवर चर्चा

मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत शिवसेना संघटन मजबुती, पक्ष विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

विजयी उमेदवारांचा होणार गौरव

नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार BLA-2 (Booth Level Agent) नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यक्रमास फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!