स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मांढरदेव येथे काळूबाईच्या यात्रेनिमित्त विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा , यात्रेला बंदी असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 29, 2021
in वाई - महाबळेश्वर - खंडाळा
ADVERTISEMENT

स्थैर्य, वाई, दि. २९: मांढरदेव येथे काळूबाईच्या यात्रेनिमित्त विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. करोना पार्श्वभूमीवर यात्रेला बंदी असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत होता.  मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद होती मांढरदेवीच्या यात्रेसाठी पौष महिन्यामध्ये दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. परंतु मांढरदेव परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याने व  यात्रा रद्द झाल्याने  प्रशासनाने भाविकांना १४ फेब्रुवारीपर्यंत  मांढरदेव येथे येण्यास बंदी घातली  त्यामुळे आज मंदिर परिसरात भाविकविना यात्रा संपन्न झाली. दरम्यान काल रात्री देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली  व देवीचा जागर निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आज पहाटे देवीचा गोंधळ घालण्यात आला. सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्ट चे मुख्य प्रशासक तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश  आर डी सावंत यांच्या हस्ते देवीची  विधिवत पूजा करण्यात आली.त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन एस जी नंदीमठ प्रांताधिकारी संगीता राजापूरकर उपविभागीय  पोलिस अधिकारी शीतल जानवे-खराडे   तहसीलदार रणजित भोसले विश्वस्त एड. महेश कुलकर्णी अतुल दोशी  चंद्रकांत मांढरे जीवन मांढरे सुधाकर क्षीरसागर शैलेंद्र क्षीरसागर राजगुरू कोचळे सचिव रामदास खामकर सचिन लक्ष्मण चोपडे यांच्यासह निवडक पुजारी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्यामुळे  काळूबाई  देवीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते  मांढरदेव परिसरात जमावबंदीचे आदेश दिल्याने पोलीस व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. यात्रेला बंदी आहे असे समजून मांढरदेव येथे येणाऱ्या भाविकांना भोर येथे शिवाजी चौक व वाई एमआयडीसी त्याचबरोबर कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिराकडे सोडले जात नाही. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे. मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही  त्यामुळे मंदिर व यात्रा परिसरात मोठा शुकशुकाट व नित्य धावपळ गजबजाट थांबल्याने जाणवत आहे.मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी, वाईचे पोलिस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहाय्यक निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, दंगा काबू पथक, जलद कृती दलाच्या तुकडीसह  मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

मॉनिंग वॉक करणाऱ्या वृद्ध पती, पत्नी अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार , सुन  जखमी 

Next Post

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

Next Post

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

ताज्या बातम्या

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

March 5, 2021

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा : 31 हजार शिक्षकांचे अस्तित्व पणाला, ना वेतन ना दिलासा; संधी देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

March 5, 2021

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल

March 5, 2021

हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

March 5, 2021

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी

March 5, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

March 5, 2021

नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

March 5, 2021

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

March 5, 2021

अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त सुझुकी वाहन खरेदीवर ऑफर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.