मॉनिंग वॉक करणाऱ्या वृद्ध पती, पत्नी अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार , सुन  जखमी 


स्थैर्य ,लोणंद, दि.२९: खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळ आज पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतात पती, पत्नीचा समावेश असुन गंभीर जखमी सुन झाली आहे. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असुन अज्ञात वाहन धडक देऊन न थांबता निघुन गेले आहे. मात्र अपघातग्रस्त वाहनाचा बंपर व नंबर प्लेट घटनास्थळी आढळून आली आहे. पोलीस या वाहनाचा शोध घेत आहेत.

लोणंद – खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळील घाडगे मळा नजीक आज पहाटे सहाच्या दरम्यान मॉनिंगवॉक साठी बबन नाना धायगुडे वय-70 वर्ष , शांताबाई बबन धायगुडे वय- 64 वर्ष ,सारिका भगवान धायगुडे वय – 34  वर्ष सर्व रा. शेळके वस्ती निघाले होते. आपल्या घरापासुन काही मीटर अंतर खंडाळा बाजुकडे चालत गेल्यानंतर पहाटे सुमारे 6 च्या सुमारास अचानकपणे अज्ञात पांढऱ्या रंगाचे कारने समोरून येऊन जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात वृध्द बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे जागीच ठार झाले तर त्यांची सुन सौ.सारीका धायगुडे   गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहीती मिळताच आसपासचे नागरीकांनी व पोलीसांनी  घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना  उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन न थांबता निघुन गेले असुन घटनास्थळी या वाहनाचा बंपर व नंबर प्लेट आढळुन आली आहे. त्यावरून वाहनाचा पोलीस तपास घेत आहेत. अज्ञात वाहन लोणंदच्या दिशेने निघुन गेले आहे.

घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी आपल्या सहकाऱ्यासमवेत दाखल होऊन रितसर पंचनामा केला आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि संतोष चौधरी करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!