
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि.२९: येथील सदर बझार परिसरात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून एकाला लाथा बुक्क्या तसेच दगडांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
याप्रकरणी अमीर फौजआलम सय्यद (रा. म्हलारपेठ,सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम चव्हाण, शंतनू (दोघांचे पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.27 रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास संजीवनी हॉस्पीटलपासून सदरबझारच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी संशयित हे त्यांच्याकडील दुचाकीवरून रॉंगसाईडने आल्याने फिर्यादीने योग्य साईडने जाण्याबाबत सांगितले. त्याचा राग मनात धरून संशयितांनी लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक झेंडे या करत आहेत.



