
कोळकी येथे डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
स्थैर्य, कोळकी, दि. 03 ऑगस्ट : साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कोळकी येथे आयोजित आठवडाभर चाललेल्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा सावित्रीबाई फुले व डॉ. अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ढाल, प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन
जयंती उत्सवाच्या निमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस जयकुमार शिंदे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर पंचायत समिती सदस्य विकास नाळे, बबलू निंबाळकर, स्वप्ना कोरडे, लक्ष्मीदेवी निंबाळकर, रेश्मा देशमुख, अबीद खान, रणजित काशिद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. फलटण तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने डॉ. अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मनोगते
राजन खिलारे यांनी प्रास्ताविक करताना आठवडाभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. जयकुमार शिंदे आणि सचिन रणवरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर व साहित्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थी प्रतिनिधी परी कांबळे हिने अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. विनोद ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप नेवसे यांनी आभार मानले. डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती २०२६, कोळकीच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. उपस्थितांसाठी नाश्ता व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.