रणजितदादांच्या माध्यमातून कोळकी जिल्हा परिषद गटात रस्ते सुधारणेसाठी ८.१५ कोटी मंजूर : जयकुमार शिंदे

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून कोळकी गटातील रस्त्यांच्या कामांसाठी ८ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

स्थैर्य, कोळकी, दि. ०३ ऑगस्ट : महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कोळकी जिल्हा परिषद गटातील विविध रस्ते सुधारणा कामांसाठी ८ कोटी १५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती भाजप नेते जयकुमार शिंदे यांनी दिली.

विविध रस्ते कामांसाठी निधीची तरतूद

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत विविध प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने:

  • कुरवली खुर्द, विंचुरणी भाग, कुरवली ते निरगुडी रस्ता सुधारणा – ४ कोटी ७० लाख रुपये

  • गिरवी ते दुधेबावी रस्ता सुधारणा – १ कोटी १३ लाख रुपये

  • विमानतळ ते ठाकूरकी रस्ता – १ कोटी १२ लाख रुपये

  • दहिवडी रस्ता ते सासकल रस्ता – ३७.५० लाख रुपये

  • विमानतळ ठाकूरकी रस्ता ते पद्मावती मंदिर ठाकूरकी तावडी रस्ता – ३७.५० लाख रुपये

  • भाडळी खुर्द ते पाटील वस्ती रस्ता – २२.५० लाख रुपये

  • सासकल ते झिरपवाडी रस्ता सुधारणा – २२.५० लाख रुपये

लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे मानले आभार

या सर्व विकासकामांना निधी मंजूर झाल्याबद्दल कोळकी गटातील नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही या मतदारसंघातील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!