“निसर्ग” चक्रीवादळाने “उमटे” गाव जनजीवन विस्कळीत


स्थैर्य, अलिबाग दि. 4 : अलिबाग किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग मधील उमटे गाव नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले आहे, चक्रीवादळाचा तडाखा इतका जोरदार होता की त्यामुळे बहुतांश लाईट खांब, मोठमोठी झाडे व असंख्य घराची मोडतोड झाली आहे, सध्या गावात लाईट नसल्याने गावचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे, गावातून नोकरी- धंद्यांसाठी मुंबई ला स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांची घरे ही मोडकळीस आल्याने मुंबईतील चाकरमानी गावी जाऊ इच्छित आहेत परंतु कोरोना व्हायरस कोव्हिड-१९ मुळे त्यांची ही कोंडी झाली आहे, सदर चक्रीवादळात विजेचा खांब अंगावर पडल्याने गावातील दशमा वाघमारे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष घालून चक्रीवादळामुळे आहत झालेल्या गावकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी सर्व उमटे ग्रामस्थानी विनंती केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!