फलटणमध्ये उत्तम पंजाबी जेवणासाठी हॉटेल दुर्वांकुर प्राईड नावारूपास येईल : आमदार दीपक चव्हाण


स्थैर्य, फलटण, दि.१९: कोळकी ता. फलटण येथे नव्याने सुरू झालेले हॉटेल दुर्वांकुर प्राईड हे फलटण तालुक्यामध्ये पंजाबी जेवणासाठी नावारूपास येईल, असे गौरवोद्गार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी काढले.

कोळकी ता. फलटण येथे नव्याने सुरू झालेल्या हॉटेल दुर्वांकुर प्राईड येथे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हॉटेल दुर्वांकुर प्राईडचे संचालक व फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे, कोळकी ग्रामपंचयतीचे माजी सरपंच व जेष्ठ सदस्य दत्तोपंत शिंदे, हॉटेल दुर्वांकुर प्राईडचे संचालक योगेश भानुशाली यांची प्रमुख उपस्थिती होती.

हॉटेल दुर्वांकुर प्राईड येथील जेवणाचा दर्जा हा अतिशय उत्तम असुन त्यांची सेवाही अतिशय विनम्र आहे. जेवणाचा दर्जा व सेवा उत्तम असल्याने फलटणकर हॉटेल दुर्वांकुर प्राईडला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास आहे, असेही आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!