फलटण: शहरात आज आठ तास वीजपुरवठा खंडित – महावितरणची माहिती


देखभाल दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामासाठी मंगळवारी (२६ मे) फलटण शहरातील बहुतांश भागात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २६ मे : महावितरणच्या वतीने फलटण शहरात मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत २२ केव्ही (22KV) वायसी (YC) वाहिनीवरील एचटी लाईनच्या (HT Line) परिसरातील झाडांच्या फांद्या तोडणे आणि डीटीसी मेन्टेनन्सच्या (DTC Maintenance) कामासाठी मंगळवारी (दि. २६) शहरात वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे.

‘या’ वेळेत वीजपुरवठा राहणार बंद

महावितरणने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सलग आठ तास या वाहिनीवरील वीजपुरवठा बंद राहील. देखभाल दुरुस्तीचे आणि धोकादायक फांद्या तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात येणार आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

या तांत्रिक कामामुळे फलटण शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा आज दिवसभर खंडित राहणार आहे. सुरळीत आणि सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी हे काम अत्यंत आवश्यक असल्याने, सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!