मुथ्थूट फायनान्स कंपनीत दरोडा, व्यवस्थापकच निघाला दरोड्यांचा मास्टरमाईंड; 10 तासात चोरटे पोलिसांच्या ताब्यात


 

स्थैर्य, वर्धा, दि.१९: शहरातील एलआयसी कार्यालयाच्या
सामोर असलेल्या मुथ्थूट फायनान्स कंपनीमध्ये सकाळच्या सुमारास धाडसी दरोडा
टाकण्यात आला होता. पोलिसांनी दहा तासात चोरट्यांना ताब्यात घेतले तर या
दरोड्याचा मास्टरमाईंड शाखेतील व्यस्थापक निघाला असल्याचे तपासात पुढे आले
आहे.

मुथ्थूट फायनान्स कंपनी
मध्ये दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चार अज्ञात
चोरट्यांकडून धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. या धाडसी दरोड्यामध्ये ९ किलो
वजनाचे आभूषण व नगदी रक्कम तीन लाख १० हजार रुपयांसह एकूण मुद्देमाल घेऊन
शाखेतील महिला कर्मचारी दीपिका हिंगे या महिलेची मोटर सायकल क्रमांक एम एच
३२ झेड १७० ही दुचाकी घेऊन पसार झाले होते.

पुढिल
तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असता,स्थानिक गुन्हे शाखेच्या
चमूने शाखेतील असलेल्या व्यवस्थापकाची सखोल चौकशी करण्याची तयारी दाखवीत
या धाडसी दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचे सामोर येताच,स्थानिक गुन्हे
शाखेचे पथक यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले. अवघ्या दहा तासात पाचही आरोपींना
ताब्यात घेत त्या चौघांकडून दोन किलो ५५६.५ ग्रॅम आभूषण किंमत एक कोटी १५
लाख ४ हजार २५० रुपये, नगदी रक्कम ९९ हजार १२० रुपये,सहा मोबाईल किंमत ३४
हजार रुपये, दोन चारचाकी वाहन क्रमांक एम एच २९ बी ए १९९९ व एम एच २९ बी सी
८३८८ ही दोन वाहने किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण चार कोटी ७५ लाख
रुपयांसह मुद्देमाल जप्त करीत बँकेतील शाखा व्यवस्थापक महेश अजाबराव
श्रीरंग वय ३५ रा उमरेड रोड नागपूर, कुशल सरदाराम आगासे वय ३२ रा यवतमाळ,
मनीष श्रीरंग घोळवे वय ३५ रा यवतमाळ, जीवन बबनराव गिरडकर वय ३६ रा यवतमाळ
कुणाल धर्मपाल शेंद्रे वय ३६ रा यवतमाळ या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात
आले आहे.अक्षय दिलीप खेरडे रा बँक ऑफ इंडिया कॉलनी वर्धा यांच्या
तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात दिनांक १७ डिसेंबर रोजी १४८४/२०२० कलम
४५२,३४२ व ३९२ भादवी सहकलम ३,४,२५ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर
कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र
इंगळे,सलीम कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, अनिल कांबळे व इतर सहकारी
यांनी केली आहे.

बऱ्याच दिवसांपासून होते धाडसी दरोड्याचे षडयंत्र- पोलीस अधीक्षक

शहरात
मध्यवर्ती भागात धाडसी दारोडा घालण्यात आला होता. त्या धाडसी दरोड्या
घालण्याचा षडयंत्र हे बऱ्याच दिवसांपासून सुरु असल्याचे तपासात उघड झाले
आहे. आणखी या मागचा सूत्रधार कोण आहेत.याचा शोध घेतला जात आहे.

घर बांधकाम व इतर कर्ज असल्याने,टाकला दरोडा

महेश
अजाबराव श्रीरंगे याने गेल्या पंधरा वर्षांपासून गोल्ड लोन या विविध कंपनी
मध्ये काम केले आहेत.त्याला आभूषण कुठे ठेवले जाते याची पूर्णपणे माहिती
असल्यामुळे त्याने हे धाडसी दरोड्याचे षडयंत्र रचले होते.त्यामध्ये पाचही
आरोपींवर घर बांधकामा करिता घेण्यात आलेले खाजगी बँकेचे कर्ज व इतर कर्ज
असल्यामुळे यांनी वर्ध्यातील मुथ्थूट फायनान्स कंपनी मध्ये दरोडा घालण्यात
आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस अधिक्षकांकडून बक्षीस

सकाळच्या
सुमारास मुथ्थूट फायनान्स कंपनी मध्ये धाडसी दारोडा टाकण्यात आला
असता,पंधरा तासात पाच आरोपींना ताब्यात घेत चार कोटी ७५ लाख रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला.दिवसा ढवळ्या शहरात धाडसी दारोडा घालण्याचा
अज्ञात चोरट्यांकडून प्रयत्न झाला असता, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये हा
संदेश वाऱ्यासारखा प्रसारित झाला.स्थानिक गुन्हे शाखेची टिम महत्वपुर्ण काम
करीत असल्यामुळे त्यांना माझ्याकडून ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जात
आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!