मेट्रो कारशेडच्या पर्यायी जागेसाठी चाचपणी सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: मेट्रो कारशेडचा वाद
काही केल्या थांबत नसल्याने अखेर कारशेडसाठी इतर जागांची चाचपणी करावी, असे
आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीए प्रशासनाला दिले आहेत.
यामुळे आता एमएमएमआरडीएला मेट्रोसाठी बीकेसी येथील जागेसह इतर जागांची
चाचपणी करून मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यावा लागणार आहे.

मेट्रोचे कारशेड गोरेगाव आरे येथे उभारले
जाणार होते. आरेचे जंगल वाचवण्यासाठी कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा
निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी
कार्यालयाने कारशेडसाठी 120 एकर जागा दिली होती. या जागेवर सॉईल टेस्टिंगचे
काम सुरू करतानाच केंद्र सरकारच्या मिठ आयुक्त कार्यालयाने ही जागा आपल्या
मालकीची असल्याचा दावा केला होता. यासाठी न्यायालयातही याचिका दाखल
झाल्यावर कांजूर येथील राज्य सरकारच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली.

कोर्टाने कारशेडच्या कामाला स्थगिती
दिल्याने मेट्रोचे कारशेड कुठे उभारली जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेट्रोची कारशेड बुलेट ट्रेनसाठी बनवल्या जाणा-या कारशेडची जागा ताब्यात
घ्यावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे. या जागेची पाहणीही एमएमआरडीए करणार
असल्याची माहिती राज्य सरकारच्या नगरविकास विभागातील अधिका-यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!