फलटणला गूढ आवाज की भूकंप?; आवाजाने चर्चा


दैनिक स्थैर्य | दि. 18 जुन 2024 | फलटण | फलटण शहरासह तालुक्यातील विविध भागामध्ये एक गूढ आवाज झाल्याने नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत. नक्की गूढ आवाज आहे की फलटणला भूकंपाचा धक्का बसला आहे; याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. परंतु झालेल्या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी फलटण शहरासह तालुक्यात अचानक एक मोठा आवाज झाला होता. त्यावेळी सुद्धा नक्की हा आवाज कशाचा झाला आहे. याचे उत्तर शासकीय यंत्रणेला सुद्धा मिळाले नव्हते. आता पुन्हा एकदा झालेल्या आवाजाने विविध चर्चांना उधाण आले आहे.


Back to top button
Don`t copy text!