उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २५: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

जैन धर्मियांचे तीर्थंकर भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवले. विश्वकल्याणाचा ‘जगा आणि जगू द्या’ हा महामंत्र दिला. माणूस जन्माने नाही, तर कामाने मोठा बनतो, ही शिकवण देऊन समाजातील वर्णवर्चस्ववादाला तिलांजली दिली. सत्य आणि अहिंसेला समर्पित केलेले भगवान महावीर यांचे जीवन आपल्याला विचारांची समृद्धता देते. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातूनच जगाचे कल्याण होऊ शकते, हा त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!