दर्‍याचीवाडी येथे कृषिदूतांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 12 जून 2025। फलटण । येथील कृषि महाविद्यालयातील कृषिदूतांचे दर्‍याचीवाडी (ता. फलटण) येथे आगमन झाले. ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगीक कार्यक्रम 2025- 26 अंर्तगत हे कृषीदूत गावातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी कृष्णकांत जगताप, हर्षल काळभोर, ओमप्रकाश गडकर, स्मित बारेला, पियुष बुरुड, प्रशांत कदम, दिग्विजय लोखंडे या कृषीदूतांचा समावेश होता.

सरपंच गोरख कुमकाले, ग्रामसेवक पोपट बोराटे, शिपाई शरद कुमकाले, प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थांनी कृषीदूतांचे स्वागत केले. तीन महिन्यांच्या कालावधीत कृषी जागरूकता, कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम, मातीतील पिक पद्धती व आधुनिक शेती पिक प्रात्यक्षिक, माती परिक्षण, पाणी व्यवस्थापन, बाजार भाव, किड व रोग व्यवस्थापन, हवामान सल्ला यावर कृषीदूत माहिती देणार आहे.

या उपक्रमासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस एम साळुंखे, कार्यक्रम समन्वयक निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित, प्रा. संजय अडत यांचे सहकार्य लाभले.

Back to top button
Don`t copy text!