शिक्षकांसाठी ई-केवायसीची मुदत ५ ऑक्टोबरपर्यंत वाढली; वेतन रोखण्याचा प्रशासनाचा कडक इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

शालार्थ प्रणालीतील ई-केवायसीसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून प्रक्रिया अपूर्ण ठेवल्यास ऑक्टोबरचे वेतन रोखले जाणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २४ सप्टेंबर : शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याची मुदत ५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत २० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि क्षेत्रीय स्तरावरील अपूर्ण कामांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा देत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

अंतिम मुदतीनंतर वेतन रोखले जाणार

शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार ५ ऑक्टोबर ही ई-केवायसीसाठी अंतिम तारीख असणार आहे. या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन (जे नोव्हेंबर महिन्यात देय असते) आहरित केले जाणार नाही, असा सक्त इशारा परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. यापुढील काळात कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व अनुदानित आणि झेडपी शाळांना नियम लागू

हा नियम खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, पूर्ण अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील. सर्व शाळांनी आपल्या स्तरावर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.

Back to top button
Don`t copy text!