वेळोशी येथे कृषीदूतांचे आगमन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 12 जून 2025। फलटण । कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांचे वेळोशी, ता. फलटण येथे आगमन झाले. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात झाले. यामध्ये कृषीदूत अविनाश चव्हाण, आदित्य शिंदे, समाधान शिंदे, रोहीत शिंदे, रोहन पवार, चैतन्य बोडरे, दयासागर पाटील यांचा समावेश आहे.

या कृषीदूतांचे सरपंच जाधव, पोलिस पाटील सौ. सुवर्णा लवंगरे, ग्रामपंचायत शिपाई गुलाब लवंगरे, रोहीदास रोमन, विजय लवंगरे, संजय कणसे, संतोष पिसाळ यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. हे कृषीदूत शेतकर्‍यांना विविध विषयावर, मार्गदर्शन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहीती दिणार आहेत. त्याच बरोबर शेतकर्‍यांना विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. परिसरातील शेतकर्‍यांना माती व पाणी परीक्षण, विविध समस्यांचे निराकरण, जनावरांचे संगोपन व काळजी, बीज प्रक्रिया इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. डी निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रा. सौ. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा.श्री. एन. एम. साळुंके, प्रा.सो. एन. ए. पंडीत यांचे सहकार्य लाभले.

Back to top button
Don`t copy text!