
थेट WhatsApp वर मिळवा
स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असोसिएट पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून उमेदवारांना ऑनलाईन डाऊनलोड करता येणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ सप्टेंबर : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्युनियर असोसिएट (क्लर्क) पदाच्या पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केले आहेत, ते एसबीआयच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
उमेदवारांना प्रवेशपत्र मिळवण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला sbi.co.in/web/careers भेट द्यावी लागेल. तेथे जॉईन एसबीआय पर्यायावर क्लिक करून करिअर विभागात जावे लागेल. त्यानंतर ज्युनियर असोसिएट पूर्व परीक्षा प्रवेशपत्र या लिंकवर क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. माहिती भरल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, जे पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करता येईल.
परीक्षेच्या दिवशी ‘हे’ नियम पाळावे लागणार
परीक्षेला जाताना उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआऊट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यासोबतच मूळ ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड) आणि त्याची एक छायांकित प्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे पालन करणे परीक्षा केंद्रावर अनिवार्य असणार आहे.
