डिजिटल कंटेंट मार्केटिंगच्या साहाय्याने वाढवा आपला व्यवसाय


स्थैर्य, दि.२: इंटरनेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याने सर्वच मोठे व लहान व्यवसाय यावरच आपल्या व्यवसायाचा पाया उभारीत आहेत. आज बहुसंख्य लोक कंटेंटचा डिजिटल पद्धतीने वापर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या खरेदीच्या निर्णयावरच परिणाम होतो असे नव्हे तर मागणी वाढते तेव्हा ती रुपांतरीत करण्यासाठी मार्ग काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे संस्थेसाठी पुढे जाण्याकरिता तसेच विक्री वाढवण्याकरिता उपयुक्त आहे. कंपन्यांनी आपल्या महसूलासाठी मजबूत डिजिटल कंटेंट मार्केटिंग धोरण आखणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात जग मोठ्या प्रमाणावर डिजिटल साधने व तंत्रज्ञान वापरत असताना, संस्थांसाठी त्यांचा बिझनेस ऑनलाइन स्वरुपात विस्तारणे तसेच महसूलाला वाट करुन देणे सोपे झाले आहे. त्यामुळे आपला बिझनेस वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा चांगल्या रीतीने वापर होऊ शकतो. डिजिटल मार्केटिंगच्या विविध पर्यायांबद्दल विस्ताराने सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडिया मार्केटिंग हे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी सर्वात वेगाने वाढणारे व सर्वात प्रभावी साधन आहे. बहुतांश खरेदीदार एकापेक्षा जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत व त्यावर वेळ घालवतात. हे लोक जोडण्यासाठी असे प्लॅटफॉर्म उपयुक्त आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या खरेदीला भरपूर प्रतिसाद मिळतो. यात खरेदी करण्यायोग्य व्हिडिओ व फोटोही असतात. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊन टार्गेट ऑडिअन्समध्ये नावीन्यपूर्ण कंटेंटचा वापर करत, ब्रँडची प्रतिमा निर्माण करणे आवश्यक आहे. आज व्यवसायांना लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, किमान फेसबुक व इन्स्टाग्रामवर असणे गरजेचे आहे.

इन्फ्लूएन्सर मार्केटिंग: बोलताना विश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करायचा असल्यास, ब्रँडची विश्वासार्हता व दीर्घकालीन नाते तयार करणे आवश्यक आहे. ग्राहकांचा विश्वास वाढवण्याचा वेगाने विस्तारणारा मार्ग म्हणजे, इन्फ्लूएन्सरच्या कंटेंटमध्ये आपला संदेश देणे व यातून आपले उत्पादन व सेवांचे मार्केटिंग करणे. इन्फ्लूएन्सर मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंग धोरणांपैकी सर्वात लोकप्रिय आहे. यातून सोशल मिडियावरील उपस्थिती, ग्राहकांची विश्वासार्हता तयार करणे, आपली पोहोच वाढवणे, संबंधित संधी व बाजारपेठ ओळखणे व तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवणे सोपे जाऊ शकते.

गूगल अॅड्सचा वापर: इंटरटेनटच्या तीन चतुर्थांशपैकी जास्त इंटरनेट ट्रॅफिक गूगल सर्चद्वारे तयार होते, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळेच डिजिटल मार्केटिंगद्वारे महसूल वाढवण्यासाठी गूगल अॅड्स हे सर्वात जुने व लोकप्रिय साधन आहे. हे योग्य प्रकारे केल्यास, गूगल सर्च अॅड्स व डिस्प्ले अॅड्स या किंमतीच्या बाबतीत फायद्याच्या आहेतच, शिवाय डिजिटल मार्केटिंगमधील सर्वात बहुउपयोगी साधन आहेत. विविध उपयुक्त मापदंडानुसार कस्टमाइज्ड अॅड चालवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, गूगलच्या डॅशबोर्डवर इन-डेफ्थ डाटा असतो. आपले डिजिटल मार्केटिंगचे कौशल्य अधिक चांगले करण्यासाठी याचा वापर करता येतो. तुम्ही युट्यूब सर्च अॅड्सचाही वापर करू शकता.

कंटेंट ऑप्टिमायझेशन: तुम्हाला तुमची ऑनलाइन उपस्थिती दर्शवायची असेल तर वेबसाइटवरील कंटेंटला ऑप्टिमाइज करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमच्या खरेदीदारांमध्ये तुमच्या वेबसाइटचा प्रभाव पहिल्यांदा पडतो. आकर्षक जाहिरातींद्वारे तुम्ही लोकांची पसंत जाणून घेण्यात यशस्वी झालात आणि ऑप्टिमाइज्ड कंटेंट असलेली वेबसाइट, मार्केटिंगच्या प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर आपल्याला अखंड साथ देईल. अशा प्रकारे ते थेट आपल्या रुपांतरीत दरावर परिणाम करते. त्यामुळे तीच टॉप लाइन व बॉटम लाइन ठरते.

युएक्स ओरिएंटेड कंटेंट: सुरुवात करण्यासाठी तुम्हाला यूझर्सचा फर अनुभव नसेल तर कंटेंट ऑप्टिमायझेशनला फार कमी महत्त्व आहे. तुमची वेबसाइट वेगवान, प्रतिसाद देणारी, अंतर्ज्ञानी, प्रदर्शनीय असणे आवश्यक आहे. युएक्स ओरिएंटेड डिझाइनमध्ये हीच गरज भागवली जाते. यासह, हा कंटेंट मोबाइल उपकरणांनाही जोडला जाऊ शकतो. विविध प्लॅटफॉर्मवर वापरता येईल. त्यानंतर भरपूर ग्राहकांचा अनुभव व अधिक उत्तम कन्व्हर्जन रेट मिळवता येतो.

सोशल मीडिया अॅड्स: सोशल मीडिया अॅड्स टार्गेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपल्या बिझनेसच्या वृद्धीसाठी प्रमोशन करिता हा सर्वात योग्य उपाय आहे. सोश मिडिया अॅड्स संभाव्य ग्राहकासोबत अधिक गुंतवणुकीकरिता मदत करतात. त्यामुळे तुमच्या कंटेंट मार्केटिंगच्या हबमध्ये बहुतांश ग्राहक थेट जुळले जातात.

डिजिटल कंटेंट मार्केटिंग हे कोणत्याही मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांच्या बिझनेसच्या वृद्धीकरिता शक्तीशाली साधन आहे. याचा जास्तीत जास्त वापर केल्यास डिजिटल मार्केटिंगची धोरणे आपली कमाई शाश्वत स्वरुपात व ताकदीने वाढवून देऊ शकतात.


Back to top button
Don`t copy text!