इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचा आज भूमिपूजन समारंभ


दैनिक स्थैर्य | दि. २९ जून २०२४ | फलटण |
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव संचलित इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पुसेगाव या नवीन मंजुरी मिळालेल्या विद्यालयात मुले-मुली यांच्या एकत्रित शिक्षणासाठी बांधण्यात येणार्‍या नूतन आरसीसी इमारतीचा भूमिपूजन समारंभ डॉ. राधाकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी शिक्षक कॉलनी पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथे शनिवार, दि. २९ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता १०८ परमपूज्य श्री महंत सुंदरगिरीजी महाराज मठाधिपती, श्री सेवागिरी महाराज देवस्थान पुसेगाव यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव अध्यक्ष डॉ. श्री. सुरेश जाधव हे असून या कार्यक्रमास श्री. बाळासाहेब जाधव श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे उपाध्यक्ष, सचिव श्री. मोहनराव जाधव, श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव, श्री सेवागिरी शि. प्र. मंडळ पुसेगावचे खजिनदार श्री. लक्ष्मणराव जाधव, विश्वस्त श्री. विश्वनाथ स. जाधव, डॉ. सुभाष च. आगाशे, श्री. विष्णूपंत कृ. खटावकर, श्री. सुभाषराव ज. जाधव, श्री. विलासराव ज. जाधव, श्री. योगेश ह. देशमुख, श्री. सूर्यकांत रा. जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या मुख्याध्यापिका व सर्व सहकारी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पुसेगाव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!