वारकर्‍यांसाठी ‘आषाढी वारी, एस.टी. आपल्या दारी…’ फलटण आगाराची खास योजना


दैनिक स्थैर्य | दि. २९ जून २०२४ | फलटण |
एस. टी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग, फलटण आगारामार्फत यंदाच्या आषाढी वारीसाठी ‘आषाढी वारी, एस.टी. आपल्या दारी…’ ही योजना आखण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत वारकर्‍यांचा ४५ जणांचा समूह असेल तर आळंदी व पंढरपूरला येथे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली जाईल. तसेच ग्रुप बुकिंगसाठी व आरक्षणाकरिता बस उपलब्ध आहेत. या बुकिंगसाठी फलटण आगारातत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण आगारातील सहाय्यक कार्यकारी अधिकारी श्री. रोहित नाईक (मो. ९९६०३९९०८९) स्थानक प्रमुख, श्री. राहुल वाघमोडे (९६३७२१२२९६) वाहतूक निरीक्षक, श्री. सुहास कोरडे (९५२७८३१२६२), श्री. रविंद्र सूर्यवंशी (९०२९३५७८१०), सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. सुखदेव आहिवळे (९८५०८०२४८०) व श्री. धीरज आहिवळे (७७५७८८६७८६) यांच्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!