
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 29 जुन 2024 | फलटण | बारामती तालुक्यातील निंबुत येथे शर्यतीच्या बैलावरून झालेल्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गत 2 दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचे नुकतेच उपचारादरम्यान निधन झाले आहे.
राज्यामधील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांची ओळख होती. यासोबत ते ज्ञानज्योत करिअर अकादमीचे ते संस्थापक होते.
