
दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२६ | फलटण |
लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील फलटण बनवण्याचे काम माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर करीत आहेत, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
फलटण शहरातील जिंती नाका येथील स्व. यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासूनच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या विकासकामांच्या माध्यमातून फलटण शहरात सकारात्मक बदल दिसून येत असल्याबद्दल गोरे यांनी समाधान व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांचा धडाका
लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या मलठणमधील असणार्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यामध्ये ८४ लाख रुपये खर्चाच्या यशवंतराव चव्हाण पुतळा ते काळूबाई मंदिर रस्ता काँक्रीटीकरण आणि ५५ लाख रुपये खर्चाच्या जिंती नाका अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणाचा समावेश आहे. एकूण १ कोटी ३९ लाख रुपयांच्या निधीतून हे विकासकाम पूर्ण केले जाणार आहे.
कार्यक्रमास आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, नरसिंह निकम, अभिजित नाईक निंबाळकर, प्रियदर्शनी भोसले, मंगलादेवी नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, संदीप चोरमले, किरण राऊत व स्वाती भोसले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक रोहित नागटिळे व कांचन व्हटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.