
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । मुंबई । भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जगाला सत्य, अहिंसा, परोपकाराच्या मार्गानं चालण्याची शिकवण दिली. मैत्रीची ताकद समजावून सांगितली. जगा आणि जगू द्या, हा संदेश दिला. भगवान महावीर यांच्या विचारात विश्वकल्याणाची ताकद आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”



