महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाची बैठक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । मुंबई । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाची 152 वी बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अध्यक्ष श्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मंत्रालय येथे झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे-सावर्डेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंजूरीसाठी विविध विषय ठेवण्यात आले होते. जल जीवन मिशनची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे व योजना काळातील कामे पूर्ण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च, 2017 या कालावधीतील सातवा वेतन आयोग सुधारित वेतन संरचना मंजूर करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!