फलटण: लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन – मान्यवरांची उपस्थिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण केंद्राच्या वतीने शंकर मार्केट येथील स्मारकावर लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

स्थैर्य, फलटण, दि. 23 जुलै : थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त फलटणमधील शंकर मार्केट येथील स्मारकावर त्यांना अभिवादन करण्यात आले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक (केंद्र फलटण) यांच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या उपक्रमाला शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे श्रीराम सहस्त्रबुद्धे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे केंद्रप्रमुख चंद्रशेखर दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी अनिरुद्ध रानडे म्हणाले की, लोकमान्य टिळक हे प्रादेशिक किंवा ठराविक समुदायाचे नेतृत्व नसून संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते. प्रमोद शास्त्री यांनी टिळकांकडून सत्याची कास धरण्याचा बाणा सर्वांनी घ्यावा, असे मत व्यक्त केले. स्मारकाची नेहमी स्वच्छता ठेवणारे व्यावसायिक राजाभाऊ धुमाळ यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

सामूहिक वंदे मातरम गायनाने या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, महिला आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!